बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यात सर्वात अगोदर मोर्चे ,आंदोलने, चर्चासत्र, चळवळ आंबेजोगाई शहरातून सुरू व्हायची त्यामुळे आंबेजोगाई शहराला मराठवाड्याचे पुणे म्हटले जायचे नंतर शैक्षणिक चळवळीचे केंद्र ठरल्याने बुद्धिजीवी नागरिकाचे शहर अशी ओळख नंतर झाली सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यात प्रत्येक जिल्हा व तालुक्यात राजकीय नेत्यांमध्ये राजकारणावरून प्रत्येक गावात, शहरात कट्टर आपापले गट होते त्या काळात राजकारणातही आंबेजोगाई शहराने वेगळी छाप निर्माण केली होती ती म्हणजे निवडणूक कोणतीही असो निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरुद्ध उमेदवार लढायचे मात्र निकालाच्या वेळी एकमेकाचे विरोधी असणारे नेते एकाच टेबलवर बसून चहा पिण्याचा आदर्श आंबेजोगाई शहराने घालून दिला आहे हे विशेष !
सांगण्याचे तात्पर्य असे की एवढे सगळे आदर्श इतरांसमोर ठेवणाऱ्या आंबेजोगाई शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना दर पाच वर्षाला मताचे दान करणाऱ्या सर्वसामान्य जनतेची ऍलर्जी आली आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असल्याने अनेकांनी या मुद्याकडे आमचे लक्ष वेधल्याने आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहोत आंबेजोगाई शहर वगळता परळी ,माजलगाव ,बीड ,आष्टी, गेवराई सर्वच शहरातील नेते, कार्यकर्ते दीपावलीनिमित्त आपापल्या मतदारसंघात येणाऱ्या शहरातील,गावातील व्यापारी,जेष्ठ नागरिक ,सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष भेटून दीपावली निमित्त शुभेच्छा देत आहेत इतर शहरांना आदर्श घालून देणाऱ्या आंबेजोगाई शहरातील असो की ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी कोणीही सर्वसामान्य जनतेला साध्या शुभेच्छा देताना दिसून येत नाही तसे पाहता राजकीय नेते ,लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार ,नगराध्यक्ष, नगरसेवक ,जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सभापती ,उपसभापती ,पंचायत समिती सदस्य यांनी शुभेच्छा द्याव्यात हा काही नियम नाही बंधनकारक नाही हेच नेते निवडणूक आली की मते मागताना मतदाराच्या घराच्या दाराची साल ठेवत नाहीत, पटापटा पाया पडतात मतदाराची प्रत्येक अट मान्य असते मग त्या मतदाराच्या मतावर निवडून आल्यानंतर राजकीय नेत्यांना सर्वसामान्य जनतेची पावणे पाच वर्षे एवढी ऍलर्जी का येते ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला तर तो प्रश्न योग्यच आहे असे वाटते
रस्त्याचा विकास अपघाताला निमंत्रन
नॅशनल हायवे च्या माध्यमातून अनेक रस्ते सिमेंटचे गुळगुळीत झाले आहेत त्यामुळे कोणतेही वाहन आपल्या क्षमतेपेक्षा अधिक गतीने धावत असल्याने अपघात वाढले आहेत लातूर ते आंबेजोगाई हा रस्ता सर्वात अगोदर झाला हा रस्ता गुळगुळीत झाल्याने या रस्त्यावर एक आड दिवसाला अपघात होतात अनेक वाहनचालकांचा जीव हकनाक जात आहे वाहन चालवताना वेगावर मर्यादा स्वतः घालून घ्यावी लागेल दुसरीकडे अनेक रस्ते गुत्तेदारांनी जुने रस्ते खोदून ठेवलेत त्या रस्त्याची एवढी दैना झाली की वाहनाच्या अशा खराब रस्त्यावरून सुद्धा वेग कमी नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे तसेच खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांच्या पाठीचे मणके खिळखिळे झाले आहेत नॅशनल हायवेच्या गुत्तेदाराला सुद्धा राज्यस्तरीय मंत्री ,आमदार, जनतेच्या समस्या मांडू शकत नाही असेच दिसते कारण पिंपळा ते आंबेजोगाई पर्यंत सिमेंट रस्ता बोगस होत होता म्हणून नागरिकांनी तो रस्ता आडवला त्यांना वेठीस धरण्यासाठी गुत्तेदाराने थेट काम बंद केले आहे अधिकारी एकदाही या रस्त्यावर फिरकला नाही अशीच समस्या डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर सुद्धा उद्भवत आहे भगवान बाबा चौकापासून चनई पर्यंत यश कन्स्ट्रक्शन कंपनीने अत्यंत दर्जेदार डांबरीकरणाचा रस्ता बनवला आहे दोन दिवसापूर्वी एन टीव्ही न्यूज चॅनेल चे पत्रकार नंदकुमार पांचाळ यांना एका मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वाराने उडवले अंबेजोगाई ते चनई रस्त्यावर वाहनांची प्रचंड ये-जा असते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी भगवान बाबा चौक ते चनई या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी पाहणी करून स्पीड स्पीड ब्रेकर टाकण्याची जनतेतून मागणी होत आहे स्पीड ब्रेकर टाकल्यास अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल
मोदींचा फराळ रुग्णांची दिवाळी
राजकारणातील नगरसेवक असो नाहीतर साधा ग्रामपंचायत सदस्य निवडून आला त्यावेळची त्याची आर्थिक परिस्थिती व शेवटच्या पाचव्या वर्षी लेखाजोखा पाहिला तर करोडचा असतो असेना का तोही विषय नाही मात्र जनतेने निवडून कशासाठी दिले आहे ? जनतेचा विकास करण्यासाठी का स्वतःचा विकास करण्यासाठी ! असा जनतेला प्रश्न पडला असून सार्वजनिक काम करण्याची मानसिकता सध्या तरी राजकारणात राहिली नाही अशा काळात बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी गेली पंचवीस-तीस वर्षापासून आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दरवर्षी फराळाचे वाटप करतात रुग्णालयात आजारी असणाऱ्या रुग्णांना दिवाळी रुग्णालयातील वार्डात घालवावी लागत आहे अशा वेळी त्यांच्या हातावर दिवाळीचा फराळ पलंगावर मिळाल्यास त्याच्या मनातील आनंद द्विगुणित होणारच रुग्णांना फराळ वाटपाच्या स्तुत्य उपक्रमाची रुग्णाचे नातेवाईक स्तुती करत पापा मोदी यांना धन्यवाद देत आहेत