बीडचे माजी खा गायकवाड यांनी दिला भाजपाचा राजीनामा

अंबेजोगाई : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपला जबर धक्का दिला आहे. त्यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजपमध्ये कुचंबणा होत असल्याचे कारण पुढे करत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started