माजी खासदार रजनीताई पाटील यांना राज्याच्या राजकारणात सक्रीय करण्यात शरद पवारांचा मोलाचा वाटा !


           राज्यपाल नियुक्त रिक्त झालेल्या बारा विधान परिषदेच्या जागेवर राज्याची सत्ताधारी शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची मिळून बनलेली महा विकास आघाडीने प्रत्येकी चार-चार जागेवर आपल्या पक्षाची नावे पदासाठी दिली ती नावे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल महोदय कडे पाठवले असून राज्यपाल ती नावे आमदार म्हणून नियुक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यात काँग्रेस पक्षातर्फे माजी खासदार रजनीताई पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले आहे राष्ट्रीय पातळीवर राजकारणात काम करणाऱ्या माजी खासदार रजनीताई पाटील यांना राज्याच्या राजकारणात सक्रीय करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोलाचा वाटा असल्याने रजनीताई पाटील फक्त आमदार म्हणून फार काळ न राहता पवारांनी ठरवले तर त्या राज्य मंत्रिमंडळात काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून मंत्री म्हणूनही त्या येऊ शकतात असा राजकीय जाणकार कयास लावत आहेत
                   बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर बीड जिल्ह्यातील जनतेने सतत शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला आहे राज्यात जे अशक्य आहे ते शक्‍य करून दाखवण्याची कुवत असणारा नेता फक्त व फक्त शरद पवार साहेबच असल्याने भाजपच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर आदळआपट केली मात्र महा विकास आघाडीची सत्ता बनण्यापासून रोखण्यात यश मिळू शकले नाही राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेपासून एक वर्षाचा कालावधी पार पडला अनेक वेळा सरकार अडचणीत आले की संकटमोचक म्हणून शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकी अगोदर आता राज्यात पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही हा विचार करून अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता पवारांनी अनेकांचा हिशोब निवडणुकीत चुकता केला भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या मुंदडा  कुटुंबाबद्दल पवारांनी विधानसभा निवडणुकीत टीका न केल्याने भाजपामधून ही मुंदडा यांचा विजय झाला अप्रत्यक्षरीत्या या विजयाचे श्रेय पवार यांनाच  जाते असेच म्हणावे लागेल
          शिवसेनेला एकत्र आणताना शरद पवारांना मोठी कसरत करावी लागल्याचे समजते गांधी कुटुंबात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या नेत्यांना भाव देण्यापेक्षा बीड जिल्ह्यातील माजी खासदार रजनीताई पाटील व गांधी घराण्याशी त्यांचा असलेला सुसंवाद पवार यांच्या नजरेतून सुटला नाही त्यांनी भाजपामध्ये अस्वस्थ असणाऱ्या एकनाथ खडसे यांचे जसे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पक्षात  थेट प्रवेश देऊन राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीत खडसेंना प्रथम प्राधान्य दिले त्याच पद्धतीने राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे पक्ष असले तरी काँग्रेस पक्षाला सोबत घेत अनेक निर्णयात पवारांची प्रमुख भूमिका राहिली आहे राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीत नाव येण्यासाठी बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  पापा मोदी अनेक वर्षांपासून इच्छुक आहेत  दरवेळी काही ना कांही  कारणे आडवी आली त्यामुळे मोदींचे आमदार होण्याचे आजही स्वप्न अधुरे राहिले  त्यांच्यानंतर  विधान विधान परिषदेवर निवड  झालेले आमदार संजय भाऊ दौंड आमदार फक्त शरद पवार यांच्यामुळे झाले हे सत्य  नाकारता येणार नाही बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून जे शिल्लक आहेत त्यात जिल्हाध्यक्ष पापा मोदी व माजी खासदार रजनीताई पाटील हे दोनच नेते काँग्रेस पक्षात जिल्ह्यात आज तरी पहावयास मिळतात दोन्हीही नेत्यांनी केज, आंबेजोगाई येथील नगरपरिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले असले तरी दोघेही नेते पक्षांतर्गत गटबाजी मुळे एकमेकांच्या विरोधी भूमिकेत सतत असतात अनेक वेळा गटबाजीचा फटका मोदींना आमदार होण्यापासून अडथळा ठरल्याची काँग्रेस पक्षात चर्चा होत आहे
       गांधी कुटुंबात सतत उठबस असणाऱ्या माजी खासदार रजनीताई पाटील यांना देशपातळीवर महत्त्वाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली आहे त्या काँग्रेस कमेटीच्या सदस्य आहेत राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीत आमदार म्हणून नियुक्त व्हावे अशी शरद पवार साहेबांची इच्छा असल्याने रजनीताईचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आले त्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला राज्यपाल महोदयांनी  संमती दिल्यानंतर त्या विधान परिषदेच्या आमदार म्हणून नियुक्त होतील अनेक राजकीय जाणकारांचा अंदाज आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ,सध्या काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समिती वर असणाऱ्या रजनीताई पाटील आमदार तर होणारच आहेत भविष्यात या राज्य मंत्रिमंडळ मध्ये महिला मंत्री म्हणून सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून येऊ शकतात रजनीताई यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना  पवारांना जो संदेश द्यायचा तो या माध्यमातून जाईल अशी चर्चा होत आहे बघू या आमदार झाल्यानंतर रजनीताई पाटील या मंत्री होतात की नाही !

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started