अंबेजोगाई:- औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना आपले प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्यावतीने शिरीष बोराळकर लढत देत आहेत भाजपाचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली नाही ,पक्ष आपल्याला विचारत नाही भाजपाला सत्तेचा माज असल्याने तो माज उतरविण्यासाठी आपण भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे अशी घोषणा त्यांनी केली गेली अनेक वर्षापासून पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवायची म्हणून ते प्रयत्नशील होते भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांना पक्ष उमेदवारी देईल अशी अपेक्षा होती मात्र त्यांची ही अपेक्षा फोल ठरली भाजपाने पुन्हा शिरीष बोराळकर यांनाच औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे रमेश पोकळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आमदार सतीश चव्हाण व शिरीष बोराळकर यापैकी कोणत्या उमेदवाराला भाजपाचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर मोकळे करतात हे निवडणूक निकालानंतरच समजेल
राजकारणात कधी काय होईल ? याची शाश्वती नसते असे म्हटले जाते कधीकाळी एकमेकांचे राजकीय विरोधक एकाच रात्री मध्ये एकमेकाचे हितचिंतक कधी झाले हे कार्यकर्त्यांना सुद्धा कळत नाही भाजप गेली अनेक वर्षे कोणत्याच सत्तेत नसल्याने पक्षात शिस्त होती भाजपाचे नेते सतत आव आणून दावा करत होते की भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असल्याचा दावा केला जायचा गेली अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भाजपाला देशात अच्छे दिन आले आहेत गल्ली ते दिल्ली सत्ता भाजपाची आली त्यामुळे प्रत्येक नेत्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या पक्षाकडून अपेक्षा वाढल्या यात भाजपामध्ये पक्षांतर्गत गटबाजी प्रमुख नेत्यात वाढली पन्नास वर्षे सत्तेत असणार्या काँग्रेस पक्षात एवढी गटबाजी वाढली आहे की आज पक्ष कुठेच सत्तेत नाही तरीही काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनता प्रादेशिक पक्षाकडे आपली पसंती नोंदवत आहे त्यामुळे अनेक निवडणुका काँग्रेस पक्ष निवडणुकीत अपयशी ठरत आहे तरीही काँग्रेस पक्षातील नेत्यांची गटबाजी संपत नाही पक्ष बुडाला तरी चालेल मात्र गटबाजी आम्ही संपू देणार नाही असा जणू नेत्यांनी विडाच उचलला आहे भाजपाच्या दहा वर्षाच्या सत्तेच्या काळामुळे गटबाजीचे पीक जोमात आल्याचे चित्र दिसत आहे त्याचा परिणाम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसत आहे
पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण विरुद्ध भाजपाचे शिरीष बोराळकर असा थेट सामना निवडणुकीत होईल व विजय आमदार चव्हाण यांचा होईल असा राजकीय निरीक्षक अंदाज बांधत असताना भाजपामध्ये उमेदवारीवरूनमाजी मुख्यमंत्री फडणवीस विरुद्ध पंकजाताई मुंडे असा भाजपा पक्षांतर्गत सामना रंगला असल्याची चर्चा होत आहे उमेदवारीच्या स्पर्धेत फडणवीस गट भारी ठरला आहे पंकजाताई मुंडे यांची शिफारस प्रवीण घुगे यांना होती असे समजते भाजपाने बोराळकर यांची उमेदवारी अंतिम केल्यानंतर प्रवीण घुगे काय करणार ? अशी चर्चा असताना बीडचे रमेश पोकळे व माजी खासदार जयसिंग गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला मात्र उमेदवारी परत घेण्याच्या दिवशी जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी परत घेत भाजपा सदस्य पदाचा राजीनामाही दिला यानंतर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पदवीधरांची आपण मोठ्या प्रमाणात नोंद केल्याने त्यांना विश्वास आहे की मराठवाड्यातील पदवीधर आपल्याला मते देतील त्यामुळे त्यांनी पक्षाची बंडखोरी करत पदवीधर मतदारसंघात आपली उमेदवारी कायम ठेवली
पदवीधर मतदारसंघात सर्वात जास्त मतदारांची नोंद बीड जिल्ह्यात आहे निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त उमेदवार बीड जिल्ह्यातील आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील मतदार उमेदवाराला पसंती देईल त्या उमेदवाराचा विजय कोणीही रोखू शकणार नाही असे वाटते विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री फडणवीस गटाने मुंडे गटाला धक्क्यावर धक्के एकानंतर एक दिले पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घुगे यांच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत आग्रह धरूनही अखेर बोराळकर यांची उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पंकजाताई मुंडे काय भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता मात्र औरंगाबाद येथील कार्यालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून पंकजाताई मुंडे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला ही चर्चा थांबते ना थांबते तोच माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे भाजपा मध्ये हा उमेदवार पंकजाताईचा उमेदवार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे रमेश पोकळे च्या बंडखोरीला पंकजाताई मुंडे मार्फत समर्थन केले जाते की खंडन येणारा काळच ठरवेल
भाजपाचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळेना पंकजाताई उघड समर्थन करणार नाहीत छुपा पाठिंबा राहिला तरी बीड जिल्ह्यातील मराठा व बंजारा समाजाची भरपूर मते पोकळेना मिळू शकतात असे भाकीत केले जाते असे झाले तर जेवढा बोराळकर यांना फटका बसणार तेवढ्यात अथवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनाही फटका बसू शकतो पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होईपर्यंत भाजप कोणतीही भूमिका घेणार नाही मात्र बोराळकर यांचा निवडणुकीत पराभव झाल्यास बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवणाऱ्या रमेश पोकळे यांच्यावर भाजपा कारवाई करू शकते त्यानंतर बीड जिल्ह्यातील भाजपामध्ये असणारे नेते कोण फडणवीस गटात व कोण पंकजाताईच्या गटात अशी विभागणी झालेले चित्र दिसेल कोणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण असू नये आज तरी भाजपाचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे कोणत्या उमेदवाराला निवडणुकीनंतर मोकळे करणार निवडणुकीनंतरच समजेल अशी बीड जिल्ह्यातील जनतेत चर्चा सुरू आहे

