अंबाजोगाईच्या धावपटू चे नाव थेट लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये.

आपल्या अंबानगरीतील युवा धावपटू दिनेश ज्ञानोबा कराड याने १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या
सायरंस आयोजित इंडियन रनिंग डे वरच्युल रन स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या अंबानगरीचे नाव इंग्लंड च्या जागतिक पातळीवर नामाकिंत समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाव नोंदवून आपल्या अंबाजोगाई करांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लिमिटेड, यूके – जागतिक प्रमाणपत्रामध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ही अग्रगण्य संस्था आहे. त्याचे प्राथमिक उद्दीष्ट आणि ध्येय रेकॉर्ड्स, सन्मान, यादी करणे आणि त्यांचे कौतुक करणे, त्यास प्रमाणीकृत करणे आणि न्यायनिवाडा करणे हे आहे. ज्यास जागतिक स्तरावरील क्रिया म्हणून संबोधित केले जाऊ शकते. सन 2017 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून त्याने आपले पंख पसरवले आहेत आणि ते युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये जागतिक उपस्थितीसह कार्य करीत आहे.

दिनेश ज्ञानोबा कराड हा एक अल्ट्रा रनर ‍♂️ असून, त्याने भारतातील अनेक प्रतिष्ठित अशा मैराथन (स्वच्छ भारत राईड, एअर फोर्स डे राईड, सरदार वल्लभभाई पटेल युनिटी राईड, गर्ल चाईल्ड डे राईड) मध्ये भाग घेतला आहे.

अशा आपल्या ह्या अंबाजोगाईच्या दिनेशला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started