भाजप उमेदवार बोराळकर विरुद्ध बंडखोरी करणाऱ्या रमेश पोकळे विरुद्ध भाजपा नेतृत्व निलंबनाची कारवाई का करत नाही? बोराळकर यांच्या बॅनर वरून मुंडेचे नाव गायब झाल्याने समर्थक हैराण  भाजपामधून आमदार सुरेश धस च्या माध्यमातून पर्याय देण्याचा प्रयत्न आंबेजोगाईत चव्हाण यांची सभा बोराळकरांच्या अद्याप पोलचिट्स सुद्धा नाहीतजिल्ह्याच्या खा प्रीतमताई व पंकजाताई मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

आंबेजोगाई (विशेष प्रतिनिधी)- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 25 ते 30 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार सतीश चव्हाण व भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात होईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत बीड जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवत आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी बोराळकर हेच भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार असून रमेश पोकळे यांचा भाजपा उमेदवारीशी संबंध नाही असा खुलासा केला आहे मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या रमेश पोकळेवर पक्षातून निलंबनाची कार्यवाही अद्याप का केली नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे  रमेश पोकळे नेमके कोणाचे उमेदवार आहेत ? असा पदवीधर मतदारांना प्रश्न पडत आहे विशेष म्हणजे पोकळे यांनी उमेदवारी दाखल करताना स्व मुंडे साहेबाचा पुतळा सोबत घेऊन जाऊन उमेदवारी अर्ज भरला आपण स्व मुंडे यांचे आजही कट्टर समर्थक असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असला तरी पोकळेला मुंडे समर्थकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते दुसरीकडे पक्षाचे अधिकृत उमेदवार बोराळकर यांच्या  बॅनर वरून मुंडे गायब असल्याने मुंडे समर्थकात अस्वस्थता पसरली आहे
        पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार आमदार सतीश चव्हाण विजयी झाले आहेत त्यांनी आपण बारा वर्षात मराठवड्यात केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला आहे हा मतदार मराठवाड्यातील 67 जिल्ह्यातून आहे सर्वात जास्त मतदारांची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात असून दुसऱ्या क्रमांकावर बीड जिल्हा आहे आमदार सतीश चव्हाण यांच्या दोन वेळा झालेला विजय व यावेळी सुद्धा विजय होणार असल्याचा ते दावा करत आहेत त्यात किती तथ्य आहे याचा आढावा घेतला असता असे दिसुन आले की त्यांची स्वतःची तर मेहनत आहेच पदवीधर मतदार बहुतांशी शिक्षण संस्थेशी सलग्न असतात चव्हाण यांच्या सुद्धा मराठवाड्यात शिक्षण संस्था आहेत दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आमदार चव्हाण असो की आमदार विक्रम काळे आमदार व्हावेत यासाठी  जीवतोड मेहनत घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोग्य सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांचा सुद्धा सिंहाचा यात वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सहा वर्षात पदवीधरांचे तीन वेळा मतदान होते ही निवडणूक झाली की दोन वर्षात पुन्हा शिक्षक आमदाराची निवडणूक लागते विक्रम काळे यांच्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागतो त्यानंतर दोन वर्षांनी विद्यापीठ सीनेटच्या निवडणुका असतात या तिन्ही प्रक्रियेत डॉक्टर नरेंद्र काळे अग्रभागी असतात  पदवीधरांचे संपर्कासाठी असणाऱ्या मोबाईल नंबर सह त्यांच्या संपर्काचा पत्ता
डॉक्टर काळे यांच्याकडे असल्याचे समजते त्यामुळे आंबेजोगाई, केज, परळी तालुक्यातील मतदारांकडे फक्त आमदार सतीश चव्हाण यांची माहिती पुस्तक व प्रतिनिधी पोहोचला विरोधी उमेदवार श्री बोराळकरांचा प्रतिनिधी सोडा साधी अद्याप पोल चिट्स सुद्धा मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आता अवघ्या दहा दिवसात मराठवाड्यातील विखुरलेल्या मतदारापर्यंत इतर उमेदवार कधी पोहोचणार व पर्याय म्हणून कोणी समोर आले नाही तर मतदारा समोर पर्याय काय ? मुळात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक जाहीर होताच मैदानात उतरला त्यांनी मराठवाड्यातील मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली भाजपाचा उमेदवार कोण आहे शेवटपर्यंत ठरला नाही राजकीय एकमेकावर कुरघोडी करत भाजपने शिरीष बोराळकर यांना आपला उमेदवार म्हणून निवडला मात्र भाजपच्या नेत्या पंकजा ताई मुंडे यांनी इतर नावासाठी आग्रह धरला होता त्यांना त्यात यश आले नाही त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहिल्या बीड जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे मुंडे समर्थक म्हणून गणले जातात त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला भाजपाच्या नेत्यांनी भाजप समर्थक उमेदवारी दाखल केलेल्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती करत उमेदवारी अर्ज परत घ्यायला लावले त्यासाठी पंकजाताई मुंडे यांना मराठवाडा पातळीवरील नेत्यांनी दखल घेतली नसल्याचे समजते त्यामुळे ही गंभीर बाब मानली जाते
         औरंगाबादचे खासदार डॉक्टर भागवत कराड असो बीडचे आमदार सुरेश धस तसेच इतर नेते पंकजाताई मंत्रीपदावर असताना पंकजा ताई साठी काम करत होते मात्र हळूहळू ते पक्षात स्थिरावले मुख्यमंत्रीपदावरून फडणवीस -मुंडे असे पक्षात सध्या दोन गट पडले असून अशा वेळी मराठवाड्यातील भाजपामध्ये असणारे नेते पंकजाताईच्या पाठीशी असावे अशी मुंडे समर्थकांची अपेक्षा ,इच्छा होती मात्र हे मतभेद ऊसतोड मजुरांच्या आंदोलनातून उघडकीस आले भाजपाने आमदार सुरेश धस यांना अधिकृत पत्र दिले त्यांनी उघड पक्ष म्हणून भूमिका घेतली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली पंकजाताई यांनी घुगे याना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला असताना त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही या निवडणुकीत डॉक्टर भागवत कराड मुख्य भूमिकेत दिसत आहेत या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांची पक्षाला गरज वाटत नाही का ? असाही प्रश्न केला जात आहे
           मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची तारीख  आठ दिवसावर आहे औरंगाबाद वगळता पंकजाताई मुंडे यांची सभा इतर ठिकाणी कुठेही झाली नाही याउलट पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी तीन पक्षाच्या नेत्यांची मोट बांधून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार आहेत ते किती मताची विभागणी करतात पाहावे लागेल रमेश पोकळे आपण मुंडे समर्थक असल्याचा दावा करत आहेत मात्र त्यांच्या उमेदवारी मागे भाजपाची नेतेमंडळी असल्याचाही त्यांच्यावर आरोप होत आहे ते या संदर्भात बोलताना म्हणतात की राष्ट्रवादी वाल्यांनी  अशी ही अफवा पसरली आहे त्याने फरक पडत नाही असाही दावा ते करतात मग प्रश्न शिल्लक राहतो पोकळे यांनी बंडखोरी करून ही भाजपाने आपल्या यांच्यावर निलंबनाची कार्यवाही का केली नाही ?

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started