अंबेजोगाई तालुक्यातील 34 शाळा,विद्यालय  उद्या होणार सुरू 378 शिक्षकांच्या तपासणीत आठ शिक्षकांना कोरोणाची लागण झाल्याचे उघड


आंबेजोगाई :-गेल्या जून पासून कोरोणाची साथ देशभरात सुरू झाल्याने शाळा,विद्यालय बंद होती राज्य शासनाने अटी व शर्ती ला अधीन राहून शाळा ,कनिष्ठ विद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे त्यानुसार अंबेजोगाई तालुक्यातील 34 शाळा उद्यापासून नववी ते बारावी पर्यंत चे वर्ग सुरू होणार असून तालुक्यातील 378 शिक्षकांची कोरोणाची तपासणी केली असता त्यात आठ शिक्षकांना कोरोणाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे शाळा ,विद्यालय सुरु कर्णयपूर्वी  शाळा व्यवस्थापनाला शिक्षण विभागाने अटी, शर्ती घालून दिल्या असून पूर्तता करणाऱ्या शाळांची शिक्षण विभागाचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी यांनी दिली
       शिक्षण विभागाने घालून दिलेले नियम पुढीलप्रमाणे आहेत

*सर्वात प्रथम  शाळा, खोल्या तसेच शाळेचे कार्यालय सर्व सॅनिटायझर करून घ्यावे लागतील

* शाळेच्या प्रत्येक वर्गातील 50 टक्के विद्यार्थी आज व राहिलेले 50 टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्यक्षात येतील

* शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती पत्र घेणे बंधनकारक राहील

*शाळा सॅनेटाइजर केली शिक्षकांनी कोरोणाची तपासणी केली या सर्व सूचना  दर्शनी भागावर लावावे लागतील

* पहिल्या दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण तर त्याच वेळी राहिलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तर दुसर्‍या दिवशी पहिल्या दिवशी चे प्रत्यक्ष वर्गात असलेली विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेतील तर ऑनलाईन घेतलेले पहिल्या दिवशी चे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेतील

अंबेजोगाई तालुक्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंत च्या सुरू होणाऱ्या शाळा, विद्यालयाची नावे पुढीलप्रमाणे आहेत
1)जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आंबेजोगाई
2 ) एस आर टी कनिष्ठ आंबेजोगाई
3 ) अनुदानित माध्यमिक विद्यालय धानोरा
4 ) सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर
5 ) जिल्हा परिषद कन्या शाळा आंबेजोगाई
6 ) मुकुंदराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबेजोगाई
7) फ़ातेमा उर्दू माध्यमिक विद्यालय आंबेजोगाई
8) क्रांतिसिंह येलडा
9 ) लोकमान्य टिळक, पोखरी
10 )जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, राडी
11) जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, गिरवली
12 )जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सायगाव
13 )जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सायगाव
14)जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, डीघोळ आंबा
15 )प्रमोद महाजन इंग्लिश स्कूल, आंबेजोगाई
16 )जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उर्दू, आंबेजोगाई
17) विवेक ज्ञान मंदिर ,बरदापुर
18 ) नेताजी ,आंबेजोगाई
19) यशवंतराव चव्हाण, आंबेजोगाई
20 ) खोलेश्वर कनिष्ठ, आंबेजोगाई
21) सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक, घाटनांदुर
22 ) गोदावरी कुंकूलोळ, आंबेजोगाई
23 ) जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पूस
24 ) मन्सूर उर्दू ,आंबेजोगाई
25 ) विश्वरूपी, देवळा
26 ) खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, आंबेजोगाई
27 ) जोधा प्रसाद मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आंबेजोगाई
28 ) वेणूताई चव्हाण कनिष्ठ विद्यालय ,आंबेजोगाई
29 ) वेणुताई कन्या ,आंबेजोगाई
30 ) डॉक्टर भालचंद्र ,आंबेजोगाई
31 ) लक्ष्मेश्वर ,घाटनादुर
32 ) महात्मा फुले ,हातोला
33 ) योगेश्वरी नूतन ,आंबेजोगाई
34 )छत्रपती शिवाजी, मुडेगाव
शाळा उद्यापासून 50 टक्के विद्यार्थी हजेरी व 50 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार आहे शाळा व्यवस्थापनाने शिक्षण विभागाने  घालून दिलेल्या अटी व शर्ती चे पालन केले की नाही यासाठी स्वतंत्र तपासणी पथक नेमले आहे हे तपासणी पत्रक शाळा विद्यालयांची तपासणी करेल अशीही माहिती शिक्षण विभागाने दिली आहे

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started