बंडखोर उमेदवार पोकळेवर होणार कार्यवाही
अंबेजोगाई:- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर आहेत पोकळेनी पक्ष उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याची जवाबदारी शिस्तभंग समिती यांची आहे कार्यवाही होईल असे सुचक वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे उमेदवार आ सतीष चव्हाण यांचा मराठवाड्यात सर्वत्र बोलबाला दिसत असुन त्या तुलनेत भाजपा उमेदवाराचा कुठेही प्रचार दिसत नाही विशेष म्हणजे भाजपा मध्ये बंडखोरी वाढली असुन बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी ठेवल्याने भाजपाला राजकीय नुकसान होत असल्याचे समजताच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व पंकजाताई मुंडे एकत्र असल्याचे चित्र दाखवन्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत होते यावेळी पत्रकार परिषदेत पोकळे यांच्या बंडखोरी बद्दल विचारना केली असता बंडखोरी करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत
