पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता खात्यावर वर्ग
आंबेजोगाई (प्रतिनिधी )-माहे जून ते ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात चोहीकडे अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या हातचे पिके गेली शेतकऱ्यांना काय करावे सुचेना अशा संकटाच्या वेळी शासनाने शेतकऱ्यांना धीर देण्याचा विश्वास देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे महा विकास आघाडी सरकारने आश्वासन दिले होते त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येकी शेतकऱ्याला हेक्टरी दोन हजार रु बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याने तालुक्यातील शेतकरी पालकमंत्री मुंडे यांना धन्यवाद देत आहे
दरवर्षी शेतकरी कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येतो त्यावेळी शासन म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते राज्यात शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले कोरोनामुळे शासनाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असताना संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही तर जनता कदापि माफ करणार नाही ही भावना मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पाहणी करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना आपला अहवाल दिला त्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आता सरसकट शेतकर्यांना अनुदान मिळणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्याचा अहवाल तात्काळ पाठविण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवला मात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे अनुदान तातडीने वितरित करण्याची विनंती केली होती
दीपावली सणाच्या वेळी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासनाने तातडीने अनुदान वाटप करावे अशा मागणीचे निवेदन परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मार्केट कमिटीचे माजी संचालक सत्यजित सिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, गौतम चाटे,सुधाकर माले, बाळासाहेब डोंगरे सह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन पालकमंत्र्यांना दिल्यानंतर पालकमंत्री त्या प्रमुख कार्यकर्त्यांना म्हणाले आपण सत्तेत आहोत, सत्ताधारी आहोत त्यावर निवेदन देणारे म्हणाले साहेब तुम्हीच आम्हाला सांगितले आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी लढा जनतेचे प्रश्न घेऊन या स्वागत आहे आम्ही तुम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करतो आहोत पालकमंत्री हसले म्हणाले मला अभिमान आहे माझे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेसाठी लढा देत आहेत
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने शेतकऱ्यांना पहिला हप्ता त्वरीत वाटप करा असे निर्देश देताच शेतकऱ्याच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम प्रत्येकी हेक्टर दोन हजार रुपये प्रमाणे वर्ग झाल्याचे समजते आंबेजोगाई तालुक्यात एकूण 61 हजार 557 शेतकरी असून दोन हजार रुपये याप्रमाणे सात कोटी 86 हजार सहाशे ऐंशी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर शेतकऱ्याच्या खात्यावर पहिला हप्ता वर्ग झाल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार सत्यजित शिरसाट ,बाळासाहेब सोनवणे, सुधाकर माले ,गौतम चाटे, बालासाहेब डोंगरे सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत
