यशवंतराव चव्हाण चौकाची दैना कधी फिटणार ?
आंबेजोगाई (प्रतिनिधी )-राज्यात सत्ता कोणाची असो महाराष्ट्राची जडणघडण करताना स्व यशवंतराव चव्हाण यांचे योगदान महाराष्ट्रातील जनता कदापि विसरू शकत नाही शरद पवार स्व चव्हाणांचे मानसपुत्र मानले जाते ही सर्व परिस्थिती असताना आज राज्यात महा विकास आघाडीचे स्थापन सरकार स्थापन केल्यामुळे शरद पवार यांच्याकडे संकट मोचक म्हणून पाहिले जाते किमान त्या आघाडी सरकारच्या काळात स्व यशवंतराव चव्हाण चौकाची दैना फिटावी अशी सर्वसामान्य जनतेतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे
अंबेजोगाई शहरात कोणत्याही राष्ट्र पुरुषाचा पुतळा नाही मात्र राष्ट्रपुरुषांच्या नावे अनेक चौक आहेत त्यापैकी एक असणारा चौक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चौक शहरातून बीड कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील चार रस्त्याचा संगम असणारा हा चौक आहे काल यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड,डॉक्टर सेलचे प्रमुख डॉ नरेंद्र काळे ,प्रदेश सरचिटणीस रणजीत लोमटे, जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी हजर होते प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण ज्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत त्या शिक्षण संस्थेने महाविद्यालयाचे नाव यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ठेवले आहे त्या संस्थेला शासनाची करोडो रुपयाची शासकीय जमीन घेतली मात्र महाराष्ट्रात राष्ट्रवादी यशवंतराव चव्हाण यांचा उदोउदो करते त्यात स्व चव्हाण यांच्या नावे असणाऱ्या चौकाला विकसित करणे अथवा सुशोभीकरण करावे असे राष्ट्रवादीच्या एकही आमदार, खासदाराला वाटू नये यापेक्षा दुर्दैव काय असू शकते ? असाही संताप अनेक चव्हाण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केला आहे
यशवंतराव चव्हाण चौक शहराच्या वैभवात भर घालणारा तर आहेच त्यासोबत या चौकात विविध व्यवसायामुळे प्रचंड गर्दीचा चौक अशी त्याची ओळख झाली आहे पूर्वी आंबेजोगाई शहरात सर्वात मोठी गर्दी शिवाजी महाराज चौकात व्हायची त्याही चौकाचे ना रुंदीकरण ना सुशोभीकरण झाले दोन्ही चौकाचे विस्तारीकरण झाले तर वाहतुकीसाठी सोयीचे होईल यशवंतराव चव्हाण चौकातून नॅशनल हायवे जात आहे या चौकात एवढी गर्दी असून उड्डाणपूल नाही अंबा कारखान्यासमोर चौकात कुठेही गर्दी नव्हती तरीही उड्डाणपुलाची गरज नसताना तिथे नॅशनल हायवे पुल केला यशवंतराव चव्हाण चौक तर प्रचंड गर्दीचा चौक आहे भविष्यात नॅशनल हायवे झाला तर मोठ्या वाहनामुळे या चौकात अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही या चौकातून कोणता लोकप्रतिनिधी ,आमदार ,खासदार गेला नाही असे नव्हे विशेष म्हणजे या चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनतेसाठी संपर्क कार्यालय आहे फारसा कोणाशी संपर्क होत नाही हा भाग वेगळा अजूनही वेळ गेलेली नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चौकाला भव्यदिव्य स्वरूप देऊन विकसित करायचा असेल तर नॅशनल हायवे रस्त्यावर उड्डाणपूल बनला तर शक्य आहे अन्यथा भविष्यात चौकाचे अस्तित्व राहील का ? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानणारे राजकारण करणाऱ्यांनी यासंदर्भात विचार करायला हवे अशीही चर्चा होत आहे
