Car -cantenor accident 5 person dead

कार-कँन्टरच्या अपघातात पाच ठार

गेवराई बायपासवरील घटना ; मयतामध्ये लातुरचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

गेवराई :-
    कार-कँन्टरच्या भिषण अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना गेवराई बायपासवर गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर घडली. मयतामध्ये लातुरचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करत घटनेचा पंचनामा केला.
   याबाबत माहिती अशी की, लातूरहून औरंगाबाद कडे निघालेली कार (एम.एच.४६ बी.९७००) हिचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याने सदरील कार विरुद्ध साईटला जाऊन उलटली. याच सुमारास औरंगाबादहून बीडकडे निघालेले कँन्टर (जी.जे.१६ ए.यू. २४७५) च्या खाली हि कार आल्याने कार काही अंतर कँन्टरने कारला फरफटत नेले. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमोपचार करुन बीड जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला. मयतामध्ये लातुरचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत करत घटनेचा पंचनामा केला.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started