मानवलोकमुळे 289 दिव्यांगाना मिळणार जयपूर फुट, हात व कॅलीपर
अंबेजोगाई (प्रतिनिधी )-
वाढत्या अपघातामुळ काही व्यक्तीचेे पाय निकामी होतात तसेच मधुमेहामुळेही पायाला जखम होतात व वेळेवर उपचार न केल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी कधी कधी काही व्यक्तीचे पाय कट करावे लागतात. सुदृढ जीवन जगत असलेला व्यक्तीच्या जीवनात अपघात, शुगर व इतर आजारामुळे पाय गमविल्यामुळे अपंगत्व आल्यास तो निराश होतो आणि आत्महत्या करण्याचा विचार करतो. अश्या दिव्यांगाना पुन्हा त्यांच्या आयुष्यात खंबीरपणे उभे करण्यासाठी मानवलोक संस्था सन 2000 पासून दर तीन वर्षांनी कृत्रिम हात , पाय व कॅलीपर बसविण्यासाठी अंबाजोगाई व सालेगाव केंद्रावर या शिबिराचे आयोजन करीत असते. दिव्यांगाना त्यांच्या गरजे प्रमाणे कृत्रिम हात, पाय, कॅलीपर व इतर साहित्य देऊन मदत करते
दि 23 नोव्हेंबर 2020 रोजी मानवलोक व रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ द्वारकादास लोहिया (बाबूजी) यांच्या दुसऱ्या स्मृतीदिना निमित्याने दि 23 ते 26 नोव्हेंबर 2020 दरम्यान जयपूर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अकोला, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर व बीड जिल्ह्यातील 289 दिव्यांगाची मापे घेण्यात आली.
दि 23 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई शिबिराचे उदघाटन आ नमिताताई मुंदडा,आ. संजयभाऊ दौंड, अशोकराव देशमुख, डॉ पांडुरंग पवार, डॉ. प्रदीप शेंडगे, डॉ. दिपक लामतुरे, डॉ. निलेश तोष्णीवाल यांनी केले.
तर दि 25 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सालेगाव येथील शिबिराचे उदघाटन सुरेशराव बिराजदार व किरण गायकवाड यांनी केले
ग्रामीण भागातील गरीब गरजू दिव्यांग व्यक्तीना कृत्रिम अवयव बसविण्यासाठी पुणे, मुंबई, जयपूर अश्या मोठ्या शहरात जावे लागते, बरेच दिव्यांग गरीब असल्यामुळे ते जाऊ शकत नाही पण मानवलोक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, महिला व पुरूषांना ही सेवा दर तीन वर्षाला उपलब्ध होत असल्यामुळे सर्व लाभार्थी मानवलोकचे आभार मानतात व समाजातील इतर संस्था, संघटनानी पुढे येण्याची विनंती करतात
सन 2000 पासून दर तीन वर्षाने मानवलोक संस्था अंबाजोगाई व उस्मानाबाद जिल्ह्यातील सालेगाव केंद्रावर जयपूर फुट, हात व कॅलीपर बसविण्याचे शिबीर घेऊन दिव्यांगाना पुन्हा त्यांच्या आयुष्यात खंबीरपणे उभे राहण्यासाठी सहकार्य करते
अनिकेत लोहिया, कार्यवाह, मानवलोक, अंबाजोगाई
अंबाजोगाईच्या दि 23, 24 व 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या शिबिरात अकोला, यवतमाळ, नांदेड, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी आले होते तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सालेगाव येथे झालेल्या शिबिरात उस्मानाबाद, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील लाभार्थी सहभागी झाले होते
एकूण 289 दिव्यांगाचे कृत्रिम अवयव देण्यासाठी मापे घेण्यात आली
डॉ विनायक गडेकर, आरोग्य विभाग प्रमुख, मानवलोक
अंबाजोगाई व उस्मानाबाद जिल्ह्यातील सालेगाव केंद्रावर होणाऱ्या या शिबीरासाठी फार लांबून दिव्यांग व सोबत नातेवाईक येतात. येणारे शिबीरार्थी गरीब कुटुंबातील असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राहण्याची व जेवणाची सोय केली जाते
लालासाहेब आगळे, सहकार्यवाह, मानवलोक, अंबाजोगाई


