सामाजिक संस्था समाजासाठी की संस्थाचालकाच्या कुटुंबासाठी ?
आंबेजोगाई :- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ शीतल आमटे यांनी विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची वार्ता अख्ख्या महाराष्ट्रात वार्यासारखी पसरली सोशल मीडियावर आत्महत्या करण्याचे कारण समजले नसले तरी गेली काही दिवसापासून आमटे कुटुंबात गृहकलह टोकाला गेल्याचे समोर आले होते त्या नंतर आमटे कुटुंबाच्या वतीने खुलासा झाल्याने गृह कलहाला पुष्टी मिळाली सामाजिक संस्था स्थापन करतेवेळी सामाजिक संस्था स्थापन करण्याचा सामाजिक नेत्याचा हेतू शुद्ध असतो त्यामुळे समाजातुन सरकार, लोकप्रतिनिधींकडून ,दानशुरा कडून भरीव मदत त्या संस्थेला मिळते मग हळूहळू त्या संस्थेचे सामाजिक संस्थेमध्ये रूपांतर होते त्यावेळी कार्यकारी मंडळावर शक्यतो घरच्या, जवळच्या नातेवाईक, कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाते संस्थेची आर्थिक ,सामाजिक प्रतिष्ठा वाढते मग हळूहळू गृहकलह वाढतो त्यामुळे आता समाजातूनच प्रश्न उपस्थित केला जात आहे की या सामाजिक संस्था समाजाच्या उपयोगासाठी असतात की संस्थाचालकाच्या कुटुंबासाठी स्थापन केल्या जातात?
आनंदवनच्या माध्यमातून बाबा आमटे यांचे कार्य महाराष्ट्रच नव्हे तर देशासमोर आहे अनेक दानशूर यांच्या मदतीवर हे आनंदवन चालत होते बाबांनी लावलेल्या रोपट्याचे पुढे वटवृक्ष झाले आनंदवनच्या कामाबद्दल, सामाजिक सेवेबद्दल कोणालाही आक्षेप नाही ,असणार नाही त्यासाठी आमटे कुटुंबाचे सामाजिक योगदान नक्कीच श्रेष्ठ आहे ! सामाजिक कार्य करणारी संस्था कोणतीही असो त्या संस्थेचे कार्यवाह, सदस्य समाजातील विविध घटकातील का नसतात ? सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेले संस्थेचे संचालक मंडळातील सदस्यांची निवड त्या संस्थेच्या सर्वसामान्य सभासदातून का होत नाही ? अनेक संस्थेचे सर्वसामान्य सदस्य बनवताना तो मागेपुढे बंड तर करणार नाही ना ? खात्री करून अशाच व्यक्तींना सदस्य करून घेतले जाते ही अवस्था सर्वच सामाजिक संस्थाची आहे त्यामुळे की काय कोण जाणे सामाजिक संस्था ज्या समाजसेवकांनी स्थापन केली त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती संस्थेचा प्रमुख म्हणून पुढे येतो राजकीय नेत्यात व सामाजिक संस्थांमध्ये फरक राहिला नाही नव्हे राजकीय नेत्याचा मुलगा वारसदार होईल की नाही हे जनता ठरवते मात्र सामाजिक संस्थेचे असणारे सभासद संस्थेचा कार्यवाह निवडत असतात !
पूर्वी सामाजिक संस्था कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणुकीत सहभाग नोंदवत नव्हत्या अलीकडे उमेदवारी सोडली तर प्रचारात महत्त्वाची भूमिका निभावणे असो कोणाला निवडून द्यावे त्यापासून नंतर सक्रिय राजकारणात सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचा सहभाग सक्रिय असतो सामाजिक संस्था आपल्या संस्थेला कोणी किती फंड दिला कुठे खर्च केला यासाठी विचारविनिमय कोणाशी केला की स्वतः निर्णय घेतला यासंदर्भात खरेतर पारदर्शकता असायला हवी मात्र कुठलीच संस्था आपले ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करत नाही निर्णय प्रक्रियेत संस्थाचालकांच्या कुटुंबातील सदस्य असल्याने इतरांना हिशोब देण्याची गरज वाटत नसावी
पोखरी शिवारातील घटना वेदनादायी
गुन्हेगारी वृत्तीला थारा न देणारे आंबेजोगाई शहर म्हणून बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात ओळख आहे मात्र बुद्धिजीवी वर्गाच्या अंबेजोगाई शहराची अवस्था रसातळाला गेली तरी स्वतःला सांस्कृतिक ,राजकीय क्षेत्रातील ठेकेदार अद्याप विचार करायला तयार नाहीत सतत इतरांना हेवा वाटावा अशा आंबेजोगाई शहराला दिशा देणारा दिशादर्शक कोण ? असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडत आहे त्यामुळे प्रशासनाला जाब कोण विचारणार ? अशी अवस्था अंबेजोगाईची झाली आहे
अंबेजोगाई तालुक्यातील पोखरी शिवारात एका सोयाबीनच्या ढिगार्यात महिला जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील घटना असून एवढी क्रूरता का निर्माण झाली ? ती महिला कोण होती ? त्याच्याशी कोणाची एवढी दुश्मनी होती तो तिच्या जीवावर का उठला? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासा नंतरच पोलीस देऊ शकतील अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनेत सध्या वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणाचा छडा लावणे ग्रामीण पोलिसांसमोर चॅलेंज आहे ते किती गतीने तपास करून प्रकरण जनते समोर आणतात पाहावे लागेल गुन्हेगारीच्या घटनेवर आळा बसणे हेही ग्रामीण पोलिसांसमोर मोठे चॅलेंज आहे
