No reach candidate to votar

पदवीधर मतदार पर्यंत उमेदवार पोहोचला ना प्रचारक !
आंबेजोगाई :- औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील मतदान आज सकाळ पासून सुरू आहे बीड जिल्ह्यात पदवीधर मतदाराची सर्वात जास्त नोंदणी आहे ती नोंदणी आम्हीच केली असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण समर्थक करत असले तरी प्रत्यक्ष मतदाराची उमेदवाराशी प्रमाणात फार कमी प्रमाणात भेट झाली असावी शहरातील मतदारांशी प्रचारकाशी भेट झाली ग्रामीण भागात राहणाऱ्या पदवीधर मतदारांशी ना उमेदवार भेटला ना प्रचारक त्यामुळे दुपारपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी फार कमी झाल्याचे समजते
           आमदार सतीश चव्हाण हे दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले होते तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवत आहेत विजय आमचा होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सचिन काळे यांनी केला आहे आ चव्हाण यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे शिरीष बोराळकर आहेत भाजपाची ही विशेष यंत्रणा सक्रिय असल्याचे चित्र दिसले नाही याउलट सध्याचे सत्ताधारी पक्ष असणारे शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे तीन पक्ष असले तरी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अधिकची जबाबदारी असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ,कनिष्ठ नेते असो अथवा नगरसेवक किंवा इतर पदाधिकारी फक्त मतदान केंद्र समोर बसून फोटो काढून आपण या निवडणुकीत कसे सक्रीय आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले राष्ट्रवादीचा दावा आहे की जे मतदान होईल त्यात बहुतांशी आमदार चव्हाणांना मतदान पडलेले असेल परळी मतदारसंघ मतदार संघातील सर्वात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष यंत्रणा लावून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची तसदी घेत असल्याचे समजते तशी यंत्रणा आंबेजोगाई तालुक्यात आढळून आली नसल्याने मतदारात आश्चर्य व्यक्त होत आहे

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started