नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी बद्दल जे बोलले अगदी खरं आहे !
राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत अंबाजोगाई व केज शहरा लगतच्या होत असलेल्या रस्त्याच्या कामाचे तुकडे स्थानिक कंत्राटदाराला दिल्याने ना कामाला गती ना दर्जा
नागरिकांना व वाहन चालकांना बसतोय फटका, अधीकारी व लोकप्रतिनीधी मुग गिळून गप्प
अंबेजोगाई :- एम एस आर डी सी अंतर्गत होत असलेल्या धायगुडा पिंपळा ते मांजर सुंबा या राष्ट्रीय महामार्गाचे कामाचे कंत्राट एच पी एम कंपनीला जरी सुटलेले असले तरी या कंपनीने सध्या अंबाजोगाई शहरा लगत सुरू असलेल्या धायगुडा पिंपळा ते लोखंडी सावरगाव व पुढे केज या रस्त्याच्या कामाचे तुकडे स्थानिक व परिसरातील कंत्राटदाराला दिल्या मुळे व या स्थानिकच्या कंत्राट दारा कडे मुबलक यंत्रसामग्री, मनुष्यबळ नसल्या कारणाने अतिशय संथ गतीने ही काम सुरू असुन याचा फटका मात्र अंबाजोगाई च्या नागरिकांना व वाहन चालकांना बसत असताना येथील अधीकारी व लोकप्रतिनीधी मुग गिळून गप्प बसले आहेत.
नितीन गडकरी यांच्या कडे केंद्रीय रस्ते विकास मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या पासुन राज्य व देशभरातील रस्त्याला सोनियाचे दिवस आलेले असले तरी बीड जिल्ह्या सह मराठवाड्यातून जाणाऱ्या रस्त्याला मात्र त्या त्या ठिकाणच्या लोकप्रतिनधीचाच अडसर असल्याचे दस्तुर खुद्द नितीन गडकरी यांनीच मान्य केल्या मुळे बीड जिल्ह्यातून जात असलेला
548 ब या देवगांव फाटा ते विजापूर
या रस्त्या पैकी अंबाजोगाई ते लातूर हा रस्ता राजस्थान येथील जी आर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने बनवल्या मुळे तो अत्यंत दर्जेदार बनल्या गेला मात्र याच 548 ब रस्त्या पैकी परळी ते धायगुडा पिंपळा या रस्त्याच्या दुरावस्थे मुळे मागील 3 वर्षा पासून नागरिक काय हाल भोगत आहेत हे बीड जिल्ह्या सह परिसराला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही.
आता या रस्त्या पाठोपाठ
एम एस आर डी सी अंतर्गत होत असलेल्या 548 ड अहमदपूर ते चुंबळी फाटा या राष्ट्रीय महामार्गाचे कामाचे कंत्राट एच पी एम कंपनीला सुटलेले असुन या रस्त्या पैकी
धायगुडा पिंपळा ते मांजर सुम्बा या 81.685 किलोमीटर च्या रस्त्याला 395 कोटी रु खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.
कंपनीच्या वतीने सध्या अंबाजोगाई शहरा लगत सुरू असलेल्या धायगुडा पिंपळा ते लोखंडी सावरगाव व पुढे केज या रस्त्याच्या कामा मध्ये धायगुडा पिंपळा, अंबाजोगाई शहर रिंगरोड, लोखंडी सावरगाव, होळ, चंदन सावरगाव, कुंबेफळ व केज शहरातून जाणारे रस्ता चार पदरी करण्याची तरतूद करण्यात आलेली असुन या रस्त्या पैकी धायगुडा पिंपळा अंबाजोगाई शहर रिंगरोड, लोखंडी सावरगांव व केज शहरा अंतर्गत एम एस आर डी सी औरंगाबाद विभागाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव व
उपअभियंता अशोक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याची जी कामे सुरू आहेत ती अत्यंत संथ गतीने सुरू असुन याला कारण म्हणजे नाशिकच्या या कंत्राटदाराने या कामाचे तुकडे स्थानिक व परिसरातील कंत्राटदाराला दिलेली आहेत. या स्थानिकच्या कंत्राटदारा कडे मुबलक यंत्रसामग्री व मनुष्यबळ नसल्या कारणाने या कामाला कुठलीही गती नाही की दर्जा नाही. त्या मुळे याचा फटका अंबाजोगाई, केज च्या नागरिकांना व वाहन चालकांना बसताना दिसत आहे.
या विषयी एकही स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या सह एकही प्रशासकीय अधिकारी या रस्त्याचे काम ज्या एम एस आर डी सी मार्फत होते आहे त्याच्या अधिकाऱ्यांना किंवा संबधीत काम करणाऱ्या एजन्सी ला विचारावयास तयार नाही यावरून रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जो आरोप केलेला आहे यात पूर्ण पणे तथ्य आहे हे नाकारुन चालणार नाही हे मात्र निश्चित.
पिंपळा धायगुडा ते पाण्याच्या टाकी पर्यंत रस्ता तातडीने करायचा नव्हता तर खोदून कशासाठी ठेवला आहे हेच समजत नाही या रस्त्यावरून जाताना काय त्रास होतो याचा अनुभव या रस्त्यावर देखरेख करणारे अधिकारी,लोकप्रतिनिधी एसी गाडीत बसून गाडीच्या काचा लावून जातात विशेष म्हणजे त्यांच्या गाड्याचे सस्पेंशन एवढे भारी असते की रस्त्यावरील खड्डयाची थोडा सुद्धा त्रास होत नाही त्यामुळे कोणीही बोलण्यास तयार नाहीत रस्त्यावरील धुळीच्या त्रासाने दमा व खड्डयामुळे जनतेच्या पाठीचे मणके खिळखिळे झाल्याने अंथुरणावर पडण्याची वेळ आली तर लोकप्रतिनिधींना जनतेपेक्षा गुत्तेदार प्रिय असतील तर जनतेचा नाईलाज आहे अशी जनतेतून चर्चा ऐकवयास मिळत आहे
