बाद होणारे मतदार खरंच पदवीधर असतील का ?
पक्षांतर्गत गटबाजी मुळे काँग्रेस सारखी भाजपाची अवस्था होणार
अंबेजोगाई -बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी आंबेजोगाई शहरात आले असता त्यांची वेणूताई चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणावर जाहीर सभा झाली होती त्यावेळी बोलताना त्यांनी गेल्या निवडणुकीत दहा हजार पदवीधर मतदारांनी आपली मते बाद केली होती यावेळी तरी तसे होऊ देऊ नका मते बात करू नका तुम्हाला आम्ही सांगण्याची वेळ का यावी ? असा प्रश्न उपस्थित करूनही या वेळी तब्बल तेवीस हजार पदवीधर मतदारांनी आपली मते बाद केल्याचे समोर आले आहे बाद होणारे मतदार खरंच पदवीधर मतदार असतील का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे तसेच पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारी व त्यानंतर झालेली पक्षांतर्गत गटबाजी मुळे भाजपाची काँग्रेस सारखी अवस्था होणार हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही अशीही चर्चा होत आहे
आमदार सतीश चव्हाण हे दोन टर्म पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताहेत मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती त्यामुळे खांदेपालट होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता मात्र भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा याच मतदार संघाचे प्रतिनिधित्व करून हॅटट्रिक करण्याची आयती संधी दिली अशी चर्चा होत आहे पदवीधर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पदवीधर मतदारांची चुकूनही डुकुन न पाहणाऱ्या शिरीष बोराळकर यांना भाजप पक्षाने शेवटच्या टप्प्यात पुन्हा उमेदवारी दिली त्या ऐवजी प्रवीण घुगे अथवा बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांना उमेदवारी दिली असती तर आमदार चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक एवढी सोपी झाली नसती मात्र दहा वर्षे सत्तेत मग्रूर झालेल्या भाजपाला महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांचा निवडणुकीत पराभव करण्यापेक्षा पक्षांतर्गत गटबाजीत बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यांचे भाजपात राजकीय दृष्ट्या महत्त्व कमी असल्याचे दाखवण्यासाठी भाजपा नेतृत्वाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली असाही मतप्रवाह असून पक्ष कार्यकर्त्यांत याच मुद्यांची चर्चा केली जात आहे
भाजप उमेदवार शिरीष बोराळकर शेवटपर्यंत मतदारापर्यंत पोहोचले नाही उमेदवारी अर्ज भरला त्याच ओळी भाजपा नेत्यांना कळून चुकले होते की आपण पराभवाच्या छायेत आहोत कारण मराठवाड्यात पंकजाताई समर्थक भाजप नेते म्हणावा तसा बोराळकर यांचा प्रचार करणार नाहीत मग एकेक करत पंकजाताई समर्थक नेत्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवता येईल पदवीधर निवडणुकीत झालेही तसेच आमदार सतीश चव्हाण यांच्या बद्दल मराठवाड्यातील पदवीधर मतदारांची नाराजी असूनही ते पन्नास हजार मतांच्या फरकाने विजयी झाले मतदानादिवशी भाजपाचे नेते नावाला भाजपाच्या पेंडॉल मध्ये दिसत होते त्यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे चव्हाण यांच्या प्रचारात दिसत होते मग बोराळकर कसे निवडून येतील?
भाजपाने नवीन शक्कल लढविली पंकजाताई मुंडे यांना राजकीयदृष्ट्या बीड जिल्ह्यातच पर्याय निर्माण करण्यासाठी आष्टीच्या आमदारांना सध्या राज्य नेतृत्व अनन्य महत्त्व देत आहे ऊसतोड मजुराच्या आंदोलनाचे नेतृत्व बदल करून भाजपा नेतृत्व पंकजा ताईंना डिवचण्याचा प्रयत्न केला त्यात काही अंशी नेत्यांना यश आल्याने नेतृत्वाने पदवीधर मतदारसंघात पंकजाताई यांनी शिफारस करतील त्या उमेदवाराला उमेदवारी न देता विरोध केला त्या उमेदवाराला उमेदवारी दिली तरीही पंकजाताई यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला भाजपाच्या चाणक्य आमदारांनी नवीन शक्कल लढवली आमदार सतीश चव्हाण यांच्या मतांची विभागणी करण्यासाठी बीड जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बंडखोरी करत पदवीधर मतदारसंघात उमेदवारी कायम ठेवली मात्र अपेक्षित परिणाम झाला नाही बोराळकर यांना गेल्या निवडणुकीत जेवढे मतदान पडले होते त्यावर समाधान मानावे लागले पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंड करणाऱ्या उमेदवाराविरुद्ध भाजपा शिस्तीचा पक्ष असणाऱ्या पक्षाने आज पावेतो बंडखोरी करणार उमेदवारांवर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने बंडखोरी मागे नेतृत्वाचे पाठबळ असल्याचे सिद्ध होत आहे
पक्षांतर्गत गतबाजीला नेतृत्वाने पाठबळ दिले की पक्षाची काय अवस्था होते याचे मूर्तिमंत उदाहरण काँग्रेस पक्ष सर्वांसमोर आहे अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या बंडखोरी ,गटबाजीमुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले तीच अवस्था आज भाजपाची झाली आहे पक्ष सत्तेत नसूनही एकमेकाची जिरवण्यासाठी विरोधी उमेदवार जिंकला तरी चालेल मात्र पक्षाच्या नेत्यांची जिरली पाहिजे याची लागण सर्वत्र झाली की पक्षाचे अस्तित्व संपायला फार उशीर लागत नाही पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाला जोपासणारी जनता त्यांच्या पाठीशी आहे तोवर त्यांच्या नेतृत्वाला धक्का कोणीही लावू शकत नाही बीड जिल्ह्यातून पंकजाताईचे नेतृत्वाला धक्का देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला सर्वजन थकल्यानंतर पंकजाताई ज्यांना आमदार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्याच आमदारा कडून पंकजाताई यांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत गटबाजीत तेच आमदार पर्याय म्हणून समोर येत आहेत
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दहावी पास प्रचारक प्रचार करत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट अनेक जणांनी टाकल्या मात्र दहावी पास प्रचारक कोण होते यांच्या नावाचा शोध आजपावेतो लागला नाही मात्र पदवी घेतलेल्या पदवीधरांची नावे मतदार यादीत आल्यानंतर प्रचार करणाऱ्या पदवीधर नेत्यांनी पदवीधरांना समजावले होते की बाबांनो पदवीधर असून मते बाद होणे पदवीधरांसाठी लाजिरवानी बाब आहे मते बाद होऊ देऊ नका गेल्यावेळी दहा हजार मते बाद झाली होती यावेळी तो आकडा कमी होण्याऐवजी वाढला यावेळी तेवीस हजार पदवीधरांचे मते बाद झाल्याचे उघडकीस आले असल्याने बाद होणारे मतदार खरंच पदवीधर होते का ? उमेदवार पसंत नाही म्हणून पदवीधरांनी हेतुपुरस्परपणे आपली मते बात केली हा संशोधनाचा विषय आहे
